Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगिरी.



 बोरगाव पोलीस ठाणेची उल्लेखनिय कामगिरी                                        तडीपार इसमाकडुन एक देशी बनावटीचे बंदुक व दोन जिवंत काडतुसे केली जप्त 


देशमुखनगर :  समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, श्रीमती वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, राजीव नवले उपविभागीय पोलीस अधीकारी सातारा उपविभाग सातारा यांनी पोलीस ठाणे हददीतील बेकायदेशीर बिगरपरवाना गावठी बंदुक बाळगणारे व दहशत निर्माण करणारें आरोर्पीचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे बोरगांव पोलीस ठाणेचे सहा पोलीस निरीक्षक वाळवेकर यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत मिळाले माहीतीवरुन सातारा जिल्हयातुन तडीपार असलेला सराईत गुन्हेगार मनोज उर्फ सोन्या वाघमारे रा. कुमठे ता. जि. सातारा हा बोरगाव पोलीस ठाणेच्या हददीत मौजे शिवाजीनगर पो- वेचले याठिकाणी मोटार सायकल वरुन येणार असल्याची बातमी मिळालेनंतर त्यांनी बोरगांव पोलीस ठाणेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पो ना प्रशांत चव्हाण, पो ना दिपक मांडवे, पो कॉ केतन जाधव, पो कॉ सतिश पवार, पो कों उत्तम गायकवाड यांना मनोज उर्फ सोन्या वाघमारे राहणार कुमठे ता. जि. सातारा यास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.


     त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांनी मिळाले गोपनिय माहीतीच्या आधारे मौजे शिवाजीनगर पो वेचले येथिल बस थांब्याजवळ सापळा रचला, काही वेळातच संशयित तडीपार इसम हा दुचाकी वरुन येताना दिसला. डी बी पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यास थांबण्याचा इशारा दिला परंतु पोलीसांना चकवा देवुन पळुन चालला होता, पोलीसांनी त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला देशी बनावटीची एक बंदुक तसेच खिश्यामध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली त्याला ताब्यात घेवुन त्याच्यावर हददपार आदेशाचा भंग व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. त्याच्याकडुन देशी बनावटीची एक बंदुक, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल हॅण्डसेट, दुचाकी असा एकुण 2,27,600/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  अश्या प्रकारच्या सराईत गुन्हेगारांवर केलेले कारवाईमुळे जनसामान्य नागरिकांकडुन बोरगांव पोलीस ठाणेचे कौतुक होत आहे.


   सदरची कारवाई ही बोरगांव पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक  डी एस वाळवेकर व महीला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार पो ना प्रशांत चव्हाण, पो ना दिपक मांडवे, पो कॉ केतन जाधव, पो कों सतिश पवार, पो कों उत्तम गायकवाड यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक कारळे हे करीत आहेत.



Post a Comment

0 Comments