Type Here to Get Search Results !

शेणोलीत "एक गाव, एक शिवजयंती".



 शेणोलीत "एक गाव, एक शिवजयंती" उपक्रमातून शिवजयंतीचा उत्साहशेणोली (ता. कराड) : येथे "एक गाव, एक शिवजयंती" या उपक्रमांतर्गत गावातील सर्व गणेश मंडळे आणि तरुण मंडळांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात व ऐतिहासिक थाटात साजरी केली. मारुती मंदिरासमोरील व्यासपीठावर फुलांची आकर्षक सजावट करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिजाऊ वंदना आणि शिव वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणला. तरुणांनी किल्ले सदाशिव गडावरून शिवज्योत आणली, तर गावात भगव्या पताका फडकत होत्या. शिवाजी महाराजांचे शौर्य, चरित्र आणि कार्य यावर आधारित शिवपौवाडे व प्रबोधन ऑडिओद्वारे सादर झाले.रात्री भव्य पालखी मिरवणूक गावातून निघाली, ज्यात धनगरी ढोल, दानपट्टा आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण झाले. ग्रामपंचायत चौक, बुद्रुक वाडा, महिंद वाडा, शेणोली सोसायटी मार्ग, वडाखाली व बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई, सहवाद्यांचा गजर आणि ग्रामस्थांचा उत्साह यांनी वातावरण भारले.या कार्यक्रमात गावातील तरुण मंडळे, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. एकसंघपणे शिवजयंती साजरी करून गावाने एकता आणि ऐक्याचा संदेश दिला.शिल्लक वर्गणी रकमेतील 6,000 रुपये किमतीची महापुरुषांच्या आयुष्यावरील ग्रंथ खरेदी करून  सार्वजनिक वाचनालयास दान करण्याचे ठरले.

Post a Comment

0 Comments