Type Here to Get Search Results !

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू..ना. दादा भुसे.


 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू : ना. दादा भुसे.


देशमुखनगर : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. - तसेच शासन खासगी शाळांतील शिक्षकांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

    सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे स्वागत महाराष्ट्र राज्य मान्य खासगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित साळुंखे, सुनील बुधावले, संदिप मस्के, रणजित भोईटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

      महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ना. दादा भुसे यांना संचमान्यता दुरुस्तीबाबत व शिक्षकांच्या अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत तसेच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये खासगी बालवाडीचे विद्यार्थी व शिक्षकांना शासनाच्या सर्व सुविधा दिल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच बीएलओंच्या नियुक्तीसंदर्भातील हाय कोर्टाच्या आदेशानुसार शासनस्तरावरुन अंमलबजावणी करावी. खासगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना रजा रोखी करणाचे लाभ देण्याचीही मागणी करण्यात आली. दरम्यान, ना. दादा भुसे यांनी याविषयी शासन सकारात्मक भूमिका घेत असून आपण योग्य ती कार्यवाही करु. खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी कायमच शासन राहील, अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. याप्रसंगी त्यांनी सातारा जिल्ह्यातील खासगी शाळांतील गुणवत्तेबद्दल गौरवोद्‌गार काढले. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधण व परीक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, कोल्हापूर शिक्षण उपसंचालक महेश चौथे, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे व हेमंतकुमार खाडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments