पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ यांच्या वतीने साताऱ्यात जल्लोष साजरा
शिवथर (सुनील साबळे) : पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व त्यांच्या सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ यांच्या वतीने तेली समाजातील कार्यकर्त्यांनी सातारा येथे एकमेकांना लाडू भरवुन व जनतेला लाडू वाटून आनंद व्यक्त केला.
देशात जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केल्याने या निर्णयाचे स्वागत सातारा येथे तमाम तेली समाज बांधवांनी केले. सातारा काँग्रेस कमिटी येथे तेली समाज बांधवांची व सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघाची तातडीची सभा पार पडली. या सभेमध्ये मा. पंतप्रधान व केंद्र सरकार यांच्या अभिनंदन व धन्यवादचा ठराव पारित करण्यात आला. त्याबाबत तेली समाज भुषण नरेंद्रजी मोदी याचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना लाडू भरवुन जल्लोष व्यक्त करण्यात आला. तसेच जनतेला लाडू वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी तिळवण तेली समाज संघाचे अध्यक्ष अनिल भोज यांच्या नेतृत्वाखाली सुरेश किर्वे, तुळशीदास शेडगे, अनिल क्षीरसागर, सुरेश चिंचकर, मनोज विभूते, वसंतराव खर्शीकर, हणमंत चिंचकर, विठ्ठल चिंचकर, लक्ष्मण गवळी, नितीन देशमाने, सुभाष हाडके, रविंद्र शेडगे, दिलीप दळवी, सोमनाथ धोत्रे, चंद्रकांत वाघचौडे, जयसिंगराव दळवी, रघुनाथ दळवी, प्रमोद दळवी, आनंदराव दळवी, असे अनेक अनेक सदस्य उपस्थित होते. तसेच सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघाचे सदस्य व उद्योग व्यापार सेल संघटनचे प्रदेशाध्यक्ष उद्योगपती पोपटराव गवळी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments