Type Here to Get Search Results !

बोरगाव पोलिसांची जबरदस्त कामगिरी

 बोरगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची जबरदस्त कामगिरी 

देशमुखनगर : ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद तसेच चोरीला गेलेली फणपाळी, गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर असा एकुण 7,40,000/- सात लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त . घरफोडी, चोरी असे गुन्हे उघडकीस आणुन चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करुन गुन्हेगारांवर कारवाईकरण्याच्या सुचना श्री राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या.                                                                       दरम्यान मौजे फत्यापुर ता.जि. सातारा येथे तक्रारदार यांचे राहते घराशेजारी मोकळ्या जागेत लावलेली ट्रॅक्टरची लोखंडीफनपाळी 40,000/- रु किंमतीची असलेली ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाणेस दाखल करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने श्री रविंद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस

निरीक्षक बोरगाव पोलीस ठाणे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना सदर गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच अज्ञात चोरट्यांचा शोध घेवुन कारवाईबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डीबी पथकाचे पोलीस नाईक प्रशांत चव्हाण व पोकॉ अतुल कणसे यांना गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, एक महिन्द्रा कंपनीचा ट्रक्टर क्रमाक MH11-DA-9615 हे संशयितरित्या नांदगाव ता.जि.सातारा गावाच्या आवारत वावरताना दिसल्याचे सांगितले. त्यावरुन डीबी पथकाने सदर ट्रक्टरचा शोध घेवुन त्यावरील चालकास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला म्हणुन त्यास विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता त्याने मीच सदरची फनपाळी चोरून आनल्याचे सांगून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी धनराज शरद जगदाळे रा. नांदगाव यास ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरीला गेलेला सात लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.

     समीर शेख पोलीस अधीक्षक, श्रीमती डॉ .वैशाली कडूकर अप्पर अधीक्षक, राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचनेनुसार बोरगाव पोलिस ठाण्याचे स. पो. नि. रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रशांत चव्हाण, अतुल कणसे, केतन जाधव, यांनी सदरची कारवाई केली. सदर गुन्ह्याचा तपास विजय म्हेत्रे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments