*मोतीबिंदू मुक्त कराड उत्तर करणार... मा. विक्रम नाना घोरपडे*
देशमुखनगर : कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मा. मनोज दादा घोरपडे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार मनोज दादा युवा मंच कराड उत्तर यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अविरतपणे चालू असलेली नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शिबिरे अनेक वर्षापासून राबवली जात आहेत, या शिबिरामध्ये लोकांना मोफत डोळ्यांची तपासणी आणि त्याचबरोबर मोफत चष्म्यांचे वाटप केले जाते, ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे अशा लोकांना पुणे येथील एचव्ही देसाई हॉस्पिटल मध्ये मोतीबिंदूचे ऑपरेशन करून दिले जाते. ही ऑपरेशने आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून मोफत केली जात असते. आज आमदार मनोज दादा घोरपडे जनसंपर्क कार्यालय उंब्रज येथून हिंगनोळे, वाघेरी, आणि वडगाव येथील 30 लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले.
अशाप्रकारे जनतेची सेवा अविरत करत राहणार, त्याचबरोबर इथून पुढेही प्रत्येक गावोगावी नेत्र चिकित्सा शिबिरे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून आयोजित केली जाणार आहेत. नेत्रचिकित्सा शिबिरात खंड पडू देणार नाही, मोतीबिंदू मुक्त कराड उत्तर करणार असे आमदार मनोज दादा घोरपडे यांचे बंधू मा. विक्रम नाना घोरपडे यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी जयवंत संभाजी जाधव संचालक केम शुगर, दिगंबर भिसे पाटील, पवन जाधव, रणजीत पाटील, योगीराज सरकाळे, अनिल माने, संतोष पाटील, इस्माईल पटेल, मानसिंग काटे, सुधीर शेळके, प्रशांत कणसे, सतीश जाधव, उद्धव पोळ, राहुल यादव, एच व्ही देसाई चे लक्ष्मण देसाई उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments