Type Here to Get Search Results !

कॅबिनेट मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जंगी स्वागतासाठी तयारी

 साताऱ्यात होणार कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजेंचे आगमन...स्वागतासाठी भव्य रॅलीचे आयोजन 

     कॅबिनेट मंत्री पदी नियुक्ति झालेले छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उद्या साताऱ्यात आगमन होणार आहे. त्यांच्या  जंगी स्वागताची तयारी झाली असून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

      विधानसभा निवडणूक लढवून जावळी तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आलेले व विधानसभेत कॅबिनेट मंत्री पदावर निवडून आल्याने शिवेंद्रराजे भोसले यांचे साताऱ्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. उद्या दि 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पूणे बँगलोर महामार्गावरील निरा नदी पुलावर त्यांचे आगमन होईल व तेथून सातारच्या दिशेने रॅली काढण्यात येणार आहे.

      नीरा नदी पुलावरुन पुढे शिरवळ, खंडाळा,भुईंज, पाचवड  मार्गे कुडाळ, करहर ते मेढा, तेथून मोळाचा ओढा आणि करंजे येथून पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे 

     पुढे वाय सी कॉलेज रोडवरून गोडोली, विलासपूर येथून अजिंक्यतारा कारखान्याकडे रॅली जाणार आहे तेथे स्व.भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीस्थळास अभिवादन करण्यात येईल व शेंद्रयातून समर्थ मंदिर येथून सुरुची बंगल्याकडे रॅली जाणार आहे. अशी माहिती शिवेंद्रराजे मित्र समूहाने दिली.

Post a Comment

0 Comments