*बोरगाव पोलिस ठाण्यात दावणीला चोवीस तास असणाऱ्या प्रबोधन"कारां"चा नवीन अधिकारी बंदोबस्त करणार का...?*
*असा सवाल जनतेतून केला जात आहे*
देशमुखनगर (सतिश जाधव) : पूर्वी पोलीस ठाण्याचे नाव जरी काढले तरी लोकांच्या मनात धडकी भरायची. कायद्यचा धाक असणाऱ्या पोलिसांची जनतेत प्रतिमा चांगली असायची, पण त्याच जनतेत पोलीस नावाची फार मोठी भीती तेवढीच होती. त्याकाळी केंव्हातरी मारामारी, चोरी, दरोडा, अपघात घडत असे, खूणासारखे प्रकार तर फारच कमी होत असल्याचे बुजर्ग सांगतात. अनेक प्रकारच्या तक्रारी गावातच मिटलेल्या जात असे. कालांतराने गावोगावी बागायती क्षेत्र वाढत चालल्याने तक्रारी, मारामाऱ्या, चोऱ्या, अपघात, खून वगैरे या प्रकारचे अनेक गुन्हे वाढत गेले. त्याचबरोबर निवडणुकांचे प्रमाण वाढत वाढत चुरशीच्या निवडी होऊ लागल्या आणि गावठगे, पुढारी ही गावागावात वाढत गेले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला की या गावठगे आणि पुढारी यांचा राबता दिसलेला मिळायचा. कालांतराने बडे नेतेही पोलीस ठाण्यात कमांड करू लागले. गावागावात दोन गट असलेल्या गटागटात उच्चापती घडल्या की त्या ठाण्यात जायच्या मगतर काय आमदार, खासदार, मंत्री हे सुद्धा हस्तक्षेप करू लागले. अलीकडे गुन्हेगारीची अराजकता वाढलेली आहे. यामध्ये सध्या नेतेमंडळी फार कमी प्रमाणात लक्ष घालतात, पण प्रबोधन करणाऱ्यांची संख्या ठाण्यात जास्त असल्याची चर्चा जनतेतून होत आहे.
शांत संयम सुसंस्कृत अशी बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांची ओळख आहे. परंतु अलीकडच्या काळात अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रमाण वाढत चालले असून ही अत्यंत खेदाची बाब आहे. बोकळलेले अवैध धंदे त्यामुळे बोरगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गावागावात अराजकता वाढली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. वाढलेल्या या अराजकतेला पोलीस विभाग जबाबदार नसून बारमाही पोलीस ठाण्यात वावरणारे प्रबोधनकार कारणीभूत आहेत. या प्रबोधन करणाऱ्या मुळे इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना व्यवस्थित काम करता येत नाही. आणि कामात सातत्य राखता येईना असे इथले कर्मचारी सांगतात. या प्रबोधन कारामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरले जात आहे. नक्की हे पोलीस ठाणे प्रबोधन करांच्या इशाऱ्यावरच चालत असते का...? असा सवालही सर्वसामान्य कडून केला जात आहे.
खरे तर गेल्या दहा-बारा वर्षांपासून बोरगाव पोलीस व नागरिकांचा एकोपात चांगल्या प्रकारे टिकून आहे. मात्र गेल्या वर्षा दिडवर्षात ठाण्यात वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. काही पोलीस सतत घमेंडीत वावरताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांशी त्यांचे वर्तन अनेकदा चीड आणणारे ठरत आहे. याला कारणीभूत आहे ठाण्यात हैदोस मांडलेल्या प्रबोधनकारांचा. पोलिसाविषयी आदरयुक्त भीती आवश्यकता असताना सतत पोलीस पोलिसी आणि प्रबोधनकारांच्या तोऱ्यात राहत असल्याने पोलीस व नागरिकांमध्ये दरी पडू लागली आहे. पोलिसांच्या प्रशासनात नागरिकांचा सहभाग असेल तर काम चांगले होते अशी भावना सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
अनेकांच्या भावना दुखावल्या जातात, अध्यात्मिक परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतो, परंतु अशा प्रकाराला आळा बसत नाही हे तीन चिंतेची बाब आहे. दिवसेंदिवस पोलिसांची बोटचेपी भूमिका वाढत चाललेली आहे. आरोपी खुशाल मोकळे फिरतात, कायद्याचा धाक उरला नाही, त्यामुळे इथली शांत, सुसंस्कृत असलेली परंपरा धोक्यात आल्याने बोरगाव पोलीस ठाण्यात दावणीला चोवीस तास असणाऱ्या प्रबोधन "कारां"चा नवीनच रुजू झालेले सपोनी अधिकारी बंदोबस्त करणार का...? असा सवाल इथल्या जनतेतून केला जात आहे.
.jpg)
Post a Comment
0 Comments