अंगापूर तर्फे येथे बुधवार दि.पाच रोजी भव्य आरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिर
देशमुखनगर : अंगापूर तर्फ ता. सातारा येथील स्वर्गीय सर्जेराव रघुनाथ कदम- शेडगे(भाऊ)यांच्या बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य तपासणी तसेच मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्याची माहिती धनंजय शेडगे- कदम यांनी दिली आहे या शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी यामध्ये ईसीजी एनजॉग्राफी एन्जोप्लास्टी सर्व मोफत होणार आहे तसेच डोळे तपासणी व यासंदर्भातील सर्व ऑपरेशन हे मोफत होणार आहेत तसेच लघवीच्या आजार संदर्भातील असणारे सर्व विकारांची तपासणी व ऑपरेशन हे मोफत होणार आहे. कर्करोग तपासणी करून या संदर्भातील तज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार होणार आहेत अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने हाडांची ठिसूळता व फुफुसांची कार्यक्षमता तपासणी होणार आहे हे शिबिर गणेश मंदिर (चौक) अंगापूर तर्फ येथे सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी आवाहन जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष धनंजय शेडगे कदम यांनी केली आहे

Post a Comment
0 Comments