सखी मंचच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविणार- सौ.समताताई घोरपडे
देशमुखनगर : स्वतंत्र आणि स्वाभिमानी श्री सावळेश्वर युवा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने महादेव मंदिर सभागृह पुसेसावळी या ठिकाणी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमात सखी म्हणजेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवले जातील महिलांच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू असे आश्वासन सखी मंचच्या अध्यक्षा व कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सुविद्य पत्नी समताताई घोरपडे यांनी दिले.
आपल्या भाषणामध्ये त्यांनी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी सर्व महिलांनी आपल्याला दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी सांगाव्यात सर्व महिलांनी एकत्र यावे एकत्र आल्याने परिवर्तन घडते असे मत व्यक्त केले.
या समारंभ प्रसंगी महिलांसाठी विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते याचा सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा ग्लास गेम बिस्कीट टास्क संगीत खुर्ची यांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी ब्रह्मकुमारी अरुणा दिली. अंगापूरच्या माजी सरपंच माननीय सौ मनीषाताई शेडगे पुसेसावळीच्या माजी सरपंच कस्तुराबाई गाढवे माजी सरपंच भारती कांबळे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी पुसेसावळी व परिसरातील सुमारे 500 महिलांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे आयोजन स्वतंत्र आणि स्वाभिमानी महिला मंच पुसेसावळीच्या सर्व महिलांनी करून कार्यक्रम पार पाडला.


Post a Comment
0 Comments