माती समृद्ध करून कृषि उत्पादकता वाढवा: बिपीन चोहान
देशमुखनगर : कृषक भारती को ऑप्रेटिव्ह लिमिटेड (कृभको) यांच्या वतीने दि.१ रोजी सातारा येथील मानसी रॉयल खेड येथे शेतकरी, सहकारी संस्थांच्या पदाधिकारी व कृषि विक्रेता साठी सहकार परिषद आयोजित करण्यात आले होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षिका विद्या जाधव कृभको आर.जी.बी.यांनी दीप प्रजवलन व प्रतिमा पूजन करून केलं.
सहकार परिषदेच्या सुरुवातीला निखिल जांभुळकर यांनी या कार्यक्रमाचे उद्देश सांगत पाहुण्यांची ओळख करून दिली.कार्यक्रमाचे प्रस्तावना शंकर शेंडगे विभागीय व्यवस्थापक यांनी केलं.त्यांनी असे नमूद केलं कि कृभको च्या सर्व उत्पादने दर्जेदार असून सर्वांनी शेतकरी समृद्ध व्हावे या साठी प्रयत्न करावे.प्रमुख पाहुणे म्हणून बिपीन चौहान राज्य विपणन व्यवस्थापक कृभको उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शन करताना असे सांगितले की, आपण काळ्या आईचे म्हणजेच मातीचे नेहमी ऋणी राहून त्याला जिवाणू,समुद्र शेवाळ ,मयकोरायझा ,झिंक यांनी समृद्ध करून कृषि उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे.तसेच त्यांनी मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता मुळे मानवी शरीरातील विविध आजारांचे संबंध या विषयावर विवेचन केले.भूषण यादगीरवार कृषि विज्ञान केंद्र बोरगाव यांनी जागतिक हवामान संकटांवर मात करण्यासाठी उपयुक्त जीवाणू चा वापर या विषयावर माहिती दिली.तसेच चुकीच्या पद्धतीने रासायनिक खतांचा व पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीचा कडकपणा व धूप वाढत जात आहे आहे.खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त जिवाणू जमिनीत घालणे गरजेचे आहे असे सांगितले. आर.डी जाधव व्यवस्थापिक्य संचालक सह्याद्री महिला कृषि उद्योग शेतकरी समूह यांनी कृभको चे उत्पादने दर्जेदार असून शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता या निविष्ठाची उपलब्धता वाढवावा असे नमूद केलं.
आभार प्रदर्शन निखिल जांभुळकर यांनी केलं.


Post a Comment
0 Comments