शालेय जीवन चीरकाल लक्षात राहते. दिनेश राठोड.
लोकमंगल हायस्कूल येथे बारावे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न .
सातारा ता .3 शालेय जीवनामध्ये केलेली मैत्री ही निस्वार्थी असते याच शालेय जीवनात शिकतो ते चिरकाल लक्षात राहते असे प्रतिपादन दिनेश राठोड यांनी केले .
सातारा औद्योगिक वसाहती मधील लोकमंगल हायस्कूल येथे आयोजित बारावे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संमेलनाध्यक्ष पदावरून राठोड बोलत होते .यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या सचिव शिल्पा चिटणीस, संचालक सतीश पवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या बाबर, ज्येष्ठ शिक्षक विजय यादव यांची प्रमुख उपस्थिती होती .
राठोड पुढे म्हणाले मी या शाळेत शिकलो त्यानंतर वीस वर्षानंतर मी या शाळेत संमेलनाध्यक्ष म्हणून मला बोलवले हे माझे भाग्य असून या शाळे मुळे मी घडलं आहे . हाफ पॅन्ट पासून फुल पॅन्ट घालण्यासाठी या शाळेने मला सर्व काही शिकवले आहे . माझ्या शालेय जीवनात मिळालेली शालेय ट्रॉफी मी अजून जपून ठेवलेली आहे शाळेच्या आठवणी चिरकाल लक्षात राहतात . शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी खेळ आणि इतर सर्व गोष्टींमध्ये भाग घेतला पाहिजे . शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते घट्ट असले पाहिजे . मराठीचे गोडवे गाण्यापेक्षा आपली सही मराठीतच केली पाहिजे असेही त्यांनी आवर्जून या ठिकाणी सांगितले माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असला पाहिजे त्याला रोज नवनवीन शिकता आले पाहिजे .
शिरीष चिटणीस म्हणाले विद्यार्थ्यांना शालेय जीवन आठवते त्यावेळचे कार्यक्रम त्यांच्या लक्षात राहतात . शालेय जीवनाच्या गोष्टी माजी विद्यार्थी सांगत असतात लहान मुलांना प्रबोधन करण्यासाठी शालेय जीवनामध्ये कार्यक्रमांचे आयोजन गरजेचे असते . विद्यार्थ्यांना नेहमी आपले प्रतिबिंब पाहता आले पाहिजे पुढे आपण काहीतरी करावयाचे आहे याच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकष्टा केली पाहिजे . शाळा सर्व काही देते भाषण, कला, गीत, खेळ याच्यातूनच खरा विद्यार्थी घडतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालकुमार साहित्य संमेलनांची नितांत आवश्यकता आहे .
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले .शिक्षक व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सर्व विषयांच्या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
कार्यक्रमास उदय जाधव, गुलाब पठाण, काकासो निकम,संगीता कुंभार, प्रतिभा वाघमोडे, भास्कर जाधव, बाळकृष्ण इंगळे, यश शिलवंत, अभिजीत वाईकर,वैशाली वाडीले,देवराम राऊत,चंद्रकांत देवगड, विजय गव्हाळे,यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पवार,वैष्णवी कोकरे यांनी केले . आभार विजय यादव यांनी मानले .

Post a Comment
0 Comments