Type Here to Get Search Results !

स्व. सर्जेराव कदम(भाऊ) यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत वैद्यकीय तपासणी


 स्वर्गीय सर्जेराव कदम भाऊ यांच्या १२ व्या स्मृती दिनानिम्मित मोफत आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा व शत्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा ८०० नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिराअंतर्गत ८७ मोतीबिंदू शत्रक्रिया ,३१ अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी तसेच कॅन्सर च्या १० संशयित रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.तसेच मूत्राशयाच्या विकारा संदर्भातील शत्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.तसेच ३०० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.या शिबिराअंतर्गत बी. पी. ,शुगर, ईसीजी ,सीबीसी ,हिमोग्लोबिन, सिरम इलेक्ट्रोलाइट,सिरम कॅल्शियम, किडनी व लिव्हर संबंधित तपासण्या,हाडाची ठिसूळता तपासणी मोफत करण्यात आल्या. तसेच तोंडाचा कर्करोग गर्भाशय कर्करोग स्तनाच्या  कर्करोग या तपासण्या मोफत करण्यात आल्या.या शिबिरासाठी उस्फुर्त प्रतीसाद लाभला.या शिबिरासाठी मोरया हॉस्पिटल साताराचे डॉ . सुनील फडतरे, डॉ.आशुतोष भोसले, डॉ.महेंद्र जाधव, सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरजचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ रविकांत पाटील, नेत्ररोग तज्ञ डॉ साक्षी पाटील, समन्वयक रविंद्र बाबर, लता मोरे, जनरल सर्जन डॉ.अजय, डॉ.अरूणा, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर शेंद्रेचे डॉक्टर अर्जुन शिंदे,डॉ.मनिषा मगर, उमंग पवार, सारिका बल्लाळ, अनिरुद्ध अडागळे, सुनिता अडागळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंगापुर वंदनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न कणसे, डॉ.सिमा पवार, तसेच उपकेंद्र अंगापूर तर्फ तारगाव येथील तज्ञ डॉक्टर व कर्मचारी वर्गाने रूग्णांची तपासणी केली.

     स्व.सर्जेराव कदम भाऊंच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

       शिबिर ठरले रूग्णांना आधार...

 सद्या हजारो रूपये खर्च करून रूग्णांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात.शासनाकडून मोठ्या आजारांवर मोफत उपचार घेण्यासाठी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते.पण या शिबिरात एन्जोग्राफी व एन्जोप्लास्टीवि व इतर अनेक आज़ाराच्या , डोळ्याच्या शस्त्रक्रिया  केवळ शिधापत्रिकेच्या पुराव्यांवर मोफत करण्यात आल्याने हे शिबिर आम्हाला आधार व नवसंजीवनी देणारे ठरले.अशा प्रतिक्रिया हृदयरोग नेत्ररोग आणि इतर व्याधिग्रस्त ग्रस्त झालेल्या रुग्णांनी व्यक्त केल्या

Post a Comment

0 Comments