दुर्गसंवर्धकांनी केला पानवठा पुनरुज्जीवित
दुर्गनादच्या सदस्यांचा स्तुत्य उपक्रम, वन्य प्राण्यांच्या पाण्याची झाली सोय
देशमुखनगर (सतिश जाधव) : अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा.. चाळीस हून अधिक असलेलं तापमान हे सध्याचे वास्तव असताना. अशा या वातावरणात वन्यप्राणी, पशुपक्षी आपली तहान कशी भागवणार कृत्रिम पाणवठे आपण किती दिवस भरणार हे लक्षात घेत परळी येथील दुर्गसंवर्धकांनी सज्जनगडच्या डोंगरात वाघवाडी गावाच्या वरच्या बाजूस असलेला. नामशेष होत चाललेला झरा (पानवठा) पुनरुज्जीवित करत वन्यप्राण्यांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची सोय केली आहे.
शनिवारी रात्री टिकाव, खोरे,घमेले घेत हे सर्व दुर्गसंवर्धक रात्रीच्या जेवणाची भाकर बांधून या मोहिमेला गेले. हा दगडाखाली असलेला झरा मात्र त्याच्यावर दगड माती पडल्यामुळे ते पाणी पशुपक्षी प्राण्यांना पिता येत नव्हते. हिच बाब लक्षात घेवून दुर्ग संवर्धकांनी एकत्र येत काळाकुट आंधारत वन्य प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. त्याच्या कार्याची सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
या मोहिमेत श्रीनिवास वांगडे, ज्ञानेश्वर निकम, शरद पवार, अमित शिंदे, विवेक माने, गणेश माने, सोमा सुतार, समीर यादव, उमेश सुतार, कृष्णा यादव, चेतन यादव सहभागी झाले झाले होते.
बॅटरीच्या सहायाने केले काम
डोंगरातील मोठ्या दगडाखाली पाण्याचा झरा होता. त्यातून तिथे ओल होती परंतु ते पाणी साचत नव्हते त्या ठिकाणी साचलेला गाळ दगड माती खांदून खोऱ्याने भरून बाजूला करण्यात आली. त्या ठिकाणी खड्डा खोदून कडेला दगड लावण्यात आले. हे सगळं काम काळोख्या अंधारात बॅटरीच्या उजेडात करण्यात आले.
हद्दवनविभागाची कार्य दुर्गसंवर्धकांचे
उन्हाळा आला की कृत्रिम पानवठे तयार करून त्यामध्ये पाणी साठा केला जातो. मात्र काही वेळेला यामध्ये सातत्य राहत नाही. हीच बाब लक्षात आल्याने नैसर्गिक पाणवठ्याचा शोध घेत दुर्गसंवर्धकांनी पनवठा सुरू करण्याचे कार्य केले. या कार्यात कोणत्याही शासकीय किंवा वनविभागाच्या मदतीची वाट बघण्यात आली नव्हती.


Post a Comment
0 Comments