Type Here to Get Search Results !

माजी विद्यार्थी हे संस्थेचे, महाविद्यालयाचे वैभव.. प्राचार्य अभयकुमार साळुंखे.



 *"माजी विद्यार्थी हे संस्थेचे, महाविद्यालयाचे  वैभव" प्राचार्य अभयकुमार साळुंखे* 


देशमुखनगर (सतिश जाधव) : 'महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हे संस्थेचे, महाविद्यालयाचे वैभव असतात' असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.ते नागठाणेच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून बोलत होते.ते पुढे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामीण,दुर्गम भागात शैक्षणिक संस्कृती केंद्रे स्थापन करून तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची गंगोत्री पोहचविण्याचे कार्य केले.आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध संस्कार केंद्रातून ज्ञानार्जन करून अनेक विद्यार्थी देश-विदेशातील विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत.नागठाणे पंचक्रोशीतील नागरिक दानशूर आणि शिक्षणाप्रती सजग असून त्यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत आपले योगदान दिलेले आहे. नागठाणे महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेहमीच अग्रगण्य राहिले आहे.

स्वागतपर मनोगतात महाविद्यालयाचे प्र प्राचार्य कॅप्टन डॉ महेश गायकवाड म्हणाले की, महाविद्यालयाच्या विकासामध्ये संस्था, प्राध्यापक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्या बरोबर माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असते.या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महाराष्ट्र आणि देशभरात विविध ठिकाणी आपली सेवा करीत आहेत ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विकास अधिकारी  श्री.तरडे व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ जे.एस्.पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री गणेश साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार श्री अमोल जाधव यांनी या माजी विद्यार्थी संघाचे कार्याचा आढावा सादर करत भविष्यकालीन योजना सांगितल्या.

याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री विक्रम बागल, प्रो डॉ केशव क्षीरसागर, डॉ लक्ष्मण शिंदे, रौप्यमहोत्सव समितीचे समन्वयक डॉ अजितकुमार जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रध्दा साळुंखे,नीता साळुंखे,अमोल सोनवले, पप्पू ढाकणे,अक्षदा जाधव,प्रा दत्तात्रय पाटील इ.माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाप्रसंगी कै.लक्ष्मण ताटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री सूरज ताटे यांनी महाविद्यालयास 5500/-देणगी दिली.तसेच महाविद्यालयास निरंतर पाणी पुरवठा केल्याबद्दल श्री राहुल कदम व श्री विजय कदम यांचा कार्याध्यक्ष साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी समिती चे समन्वयक प्रा अभय जायभाये यांनी केले.आभार माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री प्रदीप बर्गे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा एस.के.आतार यांनी केले.कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी,माजी विद्यार्थी तसेच प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments