Type Here to Get Search Results !

२५ लाखाच्या खंडणी प्रकरणी चौघांना अटक


 नागठाण्याच्या चार फाळकुट दादांना २५ लाखाच्या खंडणी प्रकरणातून अटक.                                                         देशमुखनगर : आख्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन 25 लाख रुपये खंडणी उकळल्या प्रकरणी सातारा तालुक्यातील बोरगाव ठाण्यातील पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. जानेवारी २०२४ ते  मे २०२५ या दरम्यान नागठाणे तसेच बोरगाव परिसरात ही घटना घडली. साहिल शिकलगार, परशुराम ऊर्फ भैय्या रविंद्र मोहिते, अमित ऊर्फ काळया अशोक मोहिते, रोहित संतोष मोहिते आणि अक्षय सर्जेराव मोहिते (सर्व रा. नागठाणे, ता. जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बोरगाव येथील विकास राजेंद्र कोळेकर  यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 

   पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, विकास कोळेकर हे बेकरीचा माल बनविण्याचा व्यवसाय करतात आणि हा माल दररोज पहाटेपासून नागठाणे व तारळे, सासपडे परिसरात माल विकण्यासाठी जात असतात.  या दरम्यान, संशयित आणि कोळेकर यांची रस्त्यात अनेकदा भेट होत असे.  जानेवारी २०२४ मध्ये, नागठाणे ते सासपडे रस्त्यात संशयितांनी मोटारसायकलवर येऊन कोळेकर यांच्या वाहनाला अडवले. यावेळी परशुराम ऊर्फ भैय्या मोहिते याने स्वत:ला नागठाण्याचा भाई म्हणवत “भागात व्यवसाय करायचा असेल तर दरमहा  खंडणी द्यावी लागेल, अन्यथा तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी दिली. जीवाच्या भीतीपोटी कोळेकर यांनी संशयितांना मागील त्या वेळी पैसे दिले.

    परशुराम याने कान्हाभाईसाठी गुन्हे मिटवण्यासाठी आणि गाडीचे कर्ज फेडण्यासाठी तसेच बायकोचे गहाण असलेले दागिने  सोडवण्यासाठी अशी कारणे सांगत वारंवार धमक्या देऊन आजपर्यंत ऑनलाइन १३ लाख रुपये व रोख १२ लाख रुपये असे एकूण २५ लाख रुपये उकळले. त्यानंतरही  पुन्हा पैशाची मागणी सुरू झाल्याने कोळेकर यांनी मोबाइल बंद ठेवला. यामुळे चिडलेल्या संशयितांनी  कोळेकर यांच्या बोरगावातील घरी आणि सुदेश बेकरी येथे जाऊन त्यांच्या धाकट्या भावाला धमक्या दिल्या.

  या प्रकरणी कोळेकर यांनी परशुराम मोहिते आणि इतर तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बोरगाव पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संदीप वाळवेकर यांनी डी.बी. पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.  या प्रकरणातील  चार संशयितांना अटक करण्यात आली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. हि कारवाई स. पो. नि. डी एस वाळवेकर, पो. उपनिरीक्षक स्मिता पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे प्रविण शिंदे, प्रशांत चव्हाण, दिपक मांडवे, प्रकाश वाघ,  सतिश पवार, केतन जाधव, संजय जाधव, विशाल जाधव यांनी केली. पुढिल तपास उपनिरीक्षक स्मिता पाटील करत आहेत.

Post a Comment

0 Comments