शिवथर येथे घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची चाचपणी
शिवथर : शिवथर ता. सातारा येथे सातारा पंचायत समिती गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांच्या सूचनेवरून तसेच विस्तार अधिकारी जयवंत ठाणे व अनिल ढेप यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल योजनेसाठी सर्वे करण्यात आला.
शिवथर ग्रामपंचायत साठी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवथर गावासाठी 50 घरकुल मंजूर केले गावामध्ये घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी निवड करण्यासाठी अतुल शिवाजी चव्हाण ग्रामसेवक यांनी घरोघरी जाऊन जे लाभार्थी घरकुल योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या घरी जाऊन या योजनेची माहिती दिली. शिवथर गावामध्ये जास्तीत जास्त घरकुल योजनेचा लाभ लोकांना मिळावा त्यासाठी त्यांनी उन्हाची पर्वा न बाळगता प्रयत्न करून जास्तीत जास्त घरकुल योजनेसाठी लाभार्थी बसवण्याचा प्रयत्न केला ज्या लोकांना घरासाठी जागा नाही त्या लोकांना शासकीय योजना काय असते हे देखील समजावून सांगितल्याने शिवथर ग्रामपंचायतचे सरपंच प्रिया साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे तसेच ग्रामविकास अधिकारी दादासाहेब बनकर ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ पदाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले.

Post a Comment
0 Comments