बी के डॉ सुवर्णा यांना रशियामध्ये ग्लोबल लिडर अवॅार्ड प्रदान
देशमुखनगर : रशिया तील सेंट पिट्सबर्ग मध्ये सिटीटेल हॅाटेलमध्ये आयोजित केलेल्या ग्लोबल ईकॅानॅामिक फोरम समिट मध्ये जगभरात १४३ देशात ८५०० हून अधिक सेवाकेंद्राच्या माध्यमातून निशुल्क ध्यानधारणा शिकविणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ध्यानधारणा प्रशिक्षक नागठाणे
सेवाकेंद्राच्या संचालीका १०० विश्वविक्रम करणाऱ्या १ ल्या भारतीय महिला बी के डॉ सुवर्णा यांना भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार केल्याबद्दल ब्रिक्स चे सदस्य उद्योजक अॅन्ड्रयू चिरवा यांच्या हस्ते
ग्लोबल लिडर अवॅार्ड ने सन्मान करण्यात आला. यावेळी मिस रशिया वालेरिया मिर व
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सेंट पिटर्सबर्ग रिट्रिट सेंटरच्या डायरेक्टर बी के संतोष दीदी उपस्थित होतें.
यापूर्वीही ब्रह्माकुमारी डॉक्टर सुवर्णा दीदी यांना देश व विदेशात अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यापूर्वी त्यांना लंडनमध्ये दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये ब्रिटिश पार्लमेंट मध्ये सन्मानित करण्यात आले लंडन बरोबरच दुबई या ठिकाणी इमिरेट्स एक्सलेंस अवार्ड्स मी सन्मानित करण्यात आले नेपाळमध्ये शांती पुरस्कार तर थायलंडमध्ये इंडिया थायलंड फ्रेंडशिप अवॉर्ड्स मी सन्मानित करण्यात आली त्याचबरोबर इंडिया ग्लोरी अवार्ड्स 2019 व 2020 मध्ये विश्वविख्यात फोर्ब्स मासिकात त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना यास ब्रह्माकुमारी संस्थेच्या संपर्कात त्याला व नंतर स्वतःचे संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले आता त्या पूर्ण वेळ ध्यान धरणेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य जगभरामध्ये करत आहेत त्यांनी अनेक लोकांना व्यसनमुक्त केलेले आहे अनेकांना मार्गदर्शन करून आत्महत्येपासून परावर्त केलेले आहे मुलांसाठी त्या संस्कार वर्ग ही घेत आहेत महिलांसाठी त्या सतत कार्यरत आहेत व्यसनमुक्त तणाव मुक्त बनवून योगयुक्त पद्धतीचे जीवन स्वतःही जगत असून इतरांनाही त्या श्रेष्ठ मार्गावर चालू होत आहेत
Post a Comment
0 Comments