दहावीच्या परीक्षेत अक्षरा कणसेचे दैदिप्यमान यश
देशमुखनगर (सतिश जाधव) : समाजकारण, राजकारण, आणि कृषी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अंगापूरचे राजेंद्र (आप्पा) कणसे यांची कन्या कु. अक्षरा राजेंद्र कणसे हिने दहावीच्या परीक्षेत 99. 60 टक्के मार्क्स मिळवून देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. अक्षरा हिने अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात 99. 60 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला, याबद्दल ना. आ. महेश दादा शिंदे, आमदार मनोज दादा घोरपडे, डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, भरतजी मुळे, युवा उद्योजक विक्रम नाना घोरपडे, सुनील काटकर, संतोष भाऊ कणसे, रमेश कणसे या मान्यवरांनी तसेच परिसरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, आणि गावातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


Post a Comment
0 Comments