*उंब्रज परिसरात ९० वीटभट्टींचे तीन कोटींवर नुकसान*
*अस्मानी संकटानंतर वीटभट्टींचे प्रोडक्शन थांबले)*
उंब्रज/प्रतिनिधी
गौरव खवळे
उंब्रज,ता.कराड विभागात मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने येथील वीटभट्टी व्यवसायांना मोठ्ठा फटका बसला असून 90 वीट भट्ट्यांचे सुमारे तीन कोटींवर नुकसान झाले आहे. यामुळे वीटभट्टी चालक-मालक हाताश झाला असून नुकसान भरून कसे काढायचे हा प्रश्न वीट व्यावसायिकांसमोर उभा झाला आहे. पावसाने भाजण्यासाठी रचलेल्या भट्यांचे अतोनात नुकसान झाले असून नवीन वीट तयार करण्याचे काम थांबल्यानेही कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
अस्मानी संकटनाने अनेक वीट व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. वीटभट्टी व्यवसायात अनेक नवीन व्यावसायिक बँकाना घरे,शेती तारण ठेवून लाखोंचे कर्ज घेवून या व्यवसायात उतरले आहेत पंरतु,पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून नेला आहे. उंब्रज, वडोली भिकेश्वर, कोर्टी, भोसलेवाडी, शिवडे हद्दीत वीटभट्टींचे कोट्यावधींचे नुकसान आहे. वीट व्यावसायिक विजय जाधव यांचे १५ लाख, हरिश्चंद्र कुराडे १० लाख, धनाजी बागल ८ लाख, विनायक रामचंद्र जाधव १५ लाख,
सजीन त्रिंबक माने १० लाख, सचीन बाळासाहेब कदम १५ लाख, सचीन कृष्णत साळुंखे ७ लाख, गुंडीराव राजबा केदार ८ लाख, अरविंद थोरात २० लाख, बाबासो जाधव १० लाख तसेच अर्जुन राठोड, नानासो चव्हाण अशा ९० हून वीट व्यावसायिकांचे प्रत्येकी लाखोंच्या घरात नुकसान आहे. महसूल प्रशासनाने या अस्मानी संकटातून वीट व्यवसाय वाचवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन वीट व्यावसायिकांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments