Type Here to Get Search Results !

वडुथ येथे रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये ट्रक घुसला


 वडुथ येथे रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये घुसला ट्रक 

शिवथर (सुनील साबळे) : वडुथ ता. सातारा येथे कृष्णा नदीलगत असलेल्या घरामध्ये सकाळच्या सुमारास ट्रक घुसला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

     वडूथ ता. सातारा येथे कृष्णा नदी लगत असलेल्या अपघाती वळणावर शुक्रवार दिनांक 13 रोजी सकाळी सातच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या घरामध्ये ट्रक घुसला सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही. वडूथ गावामध्ये दोन ठिकाणी अतिशय घातक वळण असल्याने बऱ्याचदा मोठ मोठे अपघात होऊन बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच बऱ्याच लोकांना जायबंदी व्हावे लागले आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग गांधारीची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत उदयनराजे मित्र समूहाचे अध्यक्ष मदन साबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी कागदोपत्री पाठपुरावा करून सुद्धा अपघाती वळणावर बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तरी वडूथ येथील अपघाती वाहनावर कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचे ब्रॅकेट लावून अपघात टाळला जावा यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments