*बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामस्थांना आवाहन*
सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपले गावांमध्ये मागील दोन महिन्यांमध्ये कोणीही बाहेरचे लोक राहायला आलेले असल्यास त्याबाबत पोलीस ठाणेस कळवावे, तसेच बाहेरून येणाऱ्या संशयित लोकांची चौकशी करावी, त्यांचे फोटो घ्यावेत.
आपले गावाचे शेजारी कोणत्याही बाहेरील वस्त्या येऊन राहिले आहेत काय याबाबत माहिती घेऊन कळवावे.
विशेष करून गावाच्या बाहेर असणाऱ्या कमी संख्येच्या वस्तीमध्ये जिथे सहजासहजी मदत मिळू शकत नाही अशा ठिकाणच्या महिलांनी जागरूक रहावे.
सद्यस्थितीत पाऊस सुरू असल्याने गावातील महिला भगिनी कामानिमित्त एकट्याच जात असतात अंधारामध्ये याचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोरीचे प्रकार वाढू शकतात याकरिता सतर्क राहून गावामध्ये सदर बाबत जागरूकता निर्माण करावी ही विनंती.
दोन चाकी वरून फिरत असतात अशी माहिती मिळत आहे. अनोळखी व्यक्ती दोनचकीवरून दिसल्यास गावातील लोकांनी मुद्दामहून चौकशी करणेबाबत जागरूक करावे.
*डी एस.वाळवेकर*
*स.पो.नि.बोरगाव*
*पोलीस ठाणे*
Post a Comment
0 Comments