न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.
देशमुखनगर (सतिश जाधव) : श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी मजरे विद्यालयाचा सैनिका साठी राखी पाठवण्याचा अनोखा उपक्रम श्रावण महिन्यात येणारा रक्षाबंधन हा लोकप्रिय वार्षिक असून या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी भावाला ओवाळून त्यांच्या मनगटा भोवती राखी बांधतात राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोरा विधिवत बांधतात हि राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते यांच गोष्टीचा बोध घेऊन आपले सैनिक बंधु हि आपले व आपल्या देशाचे सीमेवर तैनात होऊन रक्षण करत असतात म्हणून आपण सण उत्सव आनंदाने साजरे करतो पण ते मात्र या सणाला कुटुंबा पासून दूर असतात म्हणून त्यांच्या साठी राखी पाठवण्याची कल्पना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीनी ना सुचली व राख्या स्वता बनवून गठीत करुन सातारा उपजिल्हा अधिकारी मा.नागेश पाटील साहेब यांच्या मार्फत एकशे पन्नास राख्या सैनिकांना पाठवण्यात आल्या या बाबत जिल्हा अधिकारी व उप जिल्हाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांनीनीचे कौतुक केले व सर्व राख्या सैनिक भावा पर्यंत पोहचवण्यांचे आश्वासन दिले हा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खराते सर तसेच श्री वायदंडे सर श्री कांबळे सर श्री शिंदे सर श्री डॉ मोहिते सर श्री निपाणे सर व विनोद साळुंखे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शन संपन्न झाला या नाविन्यपूर्ण उपक्रमा बाबत संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होत असून विद्यार्थ्यांनीनीचे कौतुक होत आहे संस्थेचे सचिव श्री झणझणे सर उपाध्यक्ष युसुफभाई पटेल सहसचिव महेशं कदम तसेच संचालक दिलीप साळुंखे ( बापू) रामचंद्र साळुंखे (आंबा) संस्थेचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ पालक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील लोकांन कडून अभिनंदन वर्षाव होत आहे

Post a Comment
0 Comments