Type Here to Get Search Results !

लिंब येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी.



 आपणच आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे तरच धर्म टिकेल : सोपान दादा कनेरकर 

लिंब : आपल्या हिंदू लोकांनी - मुलांनी आणि महिलांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. सकाळी सकाळी भगवंताच्या पायी नतमस्तक होऊन कपाळी टिळा लावला पाहिजे. लोकहो मुलांना आपल्या हिंदू सनाबद्दल माहिती देत जा. तरच पुढील पिढीला आपली संस्कृती कळेल. आपण सण का साजरे करतो याची माहिती समजेल. असे प्रसिद्ध कीर्तनकार- व्याख्याते सोपान दादा कनेरकर म्हणाले.

लिंब ता. सातारा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, लिंब यांच्या वतीने एक गाव एक जयंती या उपक्रमाअंतर्गत लिंब गावात एकच भव्य दिव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार- व्याख्याते सोपान दादा कनेरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते पुढे म्हणाले आपण स्वतःच्या धर्मासाठी आग्रही असले पाहिजे, आपला धर्म आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. माझी वयस्कर आजी डोक्यावर पदर घेणारी हि शेवटची पिढी असणार आहे. आजकालच्या माझ्या माय माऊल्या डोक्यावर पदरच घेत नाहीत. का तर साडीचा पदर डोक्यावर थरतच नाही म्हणतायत. माऊल्यानो डोक्यावर पदर घेऊन खोचल्यावर पुढचे पोटही झाकले जाते आणि पाठही झाकली जाते. हि आमची संस्कृती आहे. या देशात नारीला देवीचे रूप मानले जाते. याची आपण कदर केली पाहिजे.

या देशात रामापेक्षा मोठा देवच नाही. त्यामुळे दिवसाची सुरवात राम राम म्हणूनच झाली पाहिजे आणि दिवसाचा शेवट हि राम राम म्हणूनच झाला पाहिजे. आम्हाला स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते.... आपणच आपले सण गणपती उत्सव, दुर्गामाता उत्सव, दहिहांडी मध्ये प्रामुख्याने डीजे लावूनच साजरा करतो. दारू पिऊन साजरा करतो. रस्त्यावर नाचून धिंगाणा घालून साजरा करतो. त्यामुळेच आपल्याला आपल्या संस्कृतीची लाज वाटते. यासाठी हे पहिले बंद केले पाहिजे. आपणच आपली संस्कृती जपत धार्मिकतेने आपण आपले सण साजरे केले पाहिजे. तरच पुढील पिढीला आपली संस्कृती समजेल. आपले सण समाजातील.

आणि तरुणांनो आपला मित्र कसा असला पाहिजे जो नेहमीच आपल्या सोबत असला पाहिजे. अडीअडचणीत साथ देणारा पाहिजे. तो कृष्णा सारखा पाहिजे, कारण समोरील विजय त्याच्यामुळे होणार आहे. तो कर्णा सारखा असला पाहिजे कारण समोर पराभव दिसत असूनही साथ न सोडणारा पाहिजे. अशी तुम्ही मैत्री केली पाहिजे.

यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार- व्याख्याते सोपान दादा कनेरकर यांचे स्वागत लक्ष्मण सावंत यांनी केले. तर प्रास्ताविक अधिक पाटील यांनी केले. यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, लिंबचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments